सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची माजरी येथे सदिच्छा भेट!,बेरोजगार व अतिक्रमण धारकांच्या समस्या निकाली काढण्याचे दिले आस्वासन

माजरी:- माजरी येथील स्थानिक परिसरात बेरोजगार व अतिक्रमण धारकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता दिनांक २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विध्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सायंकाळी 6वा. दरम्यान माजरी येथे सदिच्छा भेट दिली.
या सदिच्छा भेटीचे मुख्य कारण म्हणजेच माजरी परिसरातील वेकोली अंतर्गत येणाऱ्या व वेकोलीशी स्वलग्न असणाऱ्या कंपन्या मध्ये स्थानिक बेरोजगार ,भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्ततांना रोजगार देण्यात येत नाही,तसेच येथील कंपन्या राज्य शासनाच्या नियमांना डावलून कंपनी व कंत्राटदार मनमानी कारभार करीत आहेत याची दखल घेत हँनसन राव यांनी माजी अर्थमंत्री आमदार सुधीभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे तक्रार केली असता या तक्रारीची तात्काळ दखल घेत माजरीतील समस्या जाणून घेण्याकरिता सुधीरभाऊ यांनी मुंबई अधिवेशनात जाण्यापूर्वी भेट दिली भेटीदरम्यान सुधीरभाऊ यांनी माजरीवासीयाना स्थानिक बेरोजगारांच्या जाणून घेत समस्या आपण नक्की निकाली काढू तसेच परिसरातील अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान भा.ज.प.जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, माजरी भा. ज.प.शहर अध्यक्ष एम.पी.राव , ग्रामपंचायत सदस्य तसेच त.मु.स.अध्यक्ष हॅनसोन राव , भा.ज.प. कार्यकर्ते विस्मय बहादे, चैतन कोहळे, राकेश तालावर, राकेश येमलावार तसेच माजरी येथील पत्रकार नवप्रहार चे तालुका प्रतिनिधी अनिल सातपुते, दै.तरुण भारतचे अनिल इंगोले, लोकमत समाचारचे बबलू रॉय इत्यादी मान्यवर उपस्थित होते .