
चैतन्य कोहळे – प्रतिनिधी भद्रावती :-
चंदनखेडा गावामध्ये रात्रीच्या वेळेला वाघाचा फार प्रकोप वाढलेला आहे. ग्रामस्थांचे रात्रीच्या वेळेला शेताला पाणी देणे जागली जाणे इतरत्र काम वाघाच्या भीतीमुळे थांबून गेलेले आहे. चंदनखेडा गावातील ग्रामस्थ अनिल कुत्तरमारे यांच्या सांगण्यावरून वन विभागातील चंदनकर (गार्ड) व तेथील उगे मॅडम (राऊंड ऑफिसर) यांनी या घटनेची चौकशी केली पण त्याचे फारसे फायदे ग्रामस्थांना मिळाले नाही. तेथील वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा यासाठी संपूर्ण गाव प्रतीक्षेत आहे. कुठली मानवीय जीव हानी व्हावी नाही यासाठी वन विभागाने या विषयाकडे विशेष लक्ष घालावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
