भद्रावती तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका अविरोध

कोंढा, रालेगाव, नागलोन, पाटाला अविरोध तर मनगाव व कुचनामधे एकहाती सत्ता

भद्रावती :
तालुक्यात सेवा सहकारी संस्थेच्या आज (दि.३) ला निवडणुका पार पडल्या. या निवडणुका अविरोध करण्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांना यश आले.
सेवा सहकारी संस्था व्यवस्थापन समितीची सन २०२१-२२ ते २०२६-२७ करिता झालेल्या निवडणुकीत कोंढा सेवा सहकारी संस्था, र.न. १०८, रालेगाव सेवा संस्था र.न. २७१, नागलोन सेवा सह संस्था र.न. ४१८, पाटाला सेवा सह संस्था, या सर्व सेवा सहकारी संस्थांची निवडणूक अविरोध झाली.
तर मनगाव सेवा सह संस्था र.न. ४१९ व कुचना सेवा सहकारी संस्था र.न. २६८, या दोन्ही संस्थाच्या झालेच्या निवडणुकीत ४० ते ५० मतांच्या फरकाने एकहाती सत्ता मिळविण्यात आली.
निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, जि. प. सदस्य प्रविण सुर, सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने यांनी अभिनंदन केले आहे.
कुचना सेवा सह संस्थेचे सर्वसाधारण गटातून सुरेश लाटारी मंगाम, प्रफुल विनायक ताजने, रविंद्र भाऊराव ताजने, कान्होबा लटारी तिखट, शरद आनंदराव महातले, मधुकर आत्माराम महातले, महादेव शामराव लांबट, गणेश नथुजी वैदय, महिला राखीव गटातून अंजनाबाई उरकुडा तिखट, सखुबाई दादाजी लोखंडे, इमाव गटातून संतोष गोविंदा काले, अनु. जाती जमाती गटातून सुनिल दौलत वानखेडे निवडून आले.
मनगाव सेवा सह. संस्थेमधे सर्वसाधारण गटातून मनोहर शत्रुघ्न आगलावे, विजय मारोती काकडे, अरुण चोपणे, रुपेश मनोहर टोंगे, पांडुरंग नानाजी कुंभारे, अनिल वामन खामकर, प्रशांत टोंगे, सुरेश ढवस, महिला गटातून मंदाबाई नथ्यु वांढरे, शालूबाई गुलाब वांढरे, ईमाव गटातून भारत गणपत वांढरे, अनु. जाती जमाती गटातून विजय नारायण येरकाडे, आदी निवडून आले.
तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका अविरोध लावण्याचा सपाटा रवि शिंदे यांनी लावला आहे. यातून गावागावांतील वातावरण खेळीमेळीचे व एकोप्याचे असावे, अशी भावना रवि शिंदे यांनी व्यक्त केली.