भाजपची जन आशीर्वाद यात्रा नंदुरबार जिल्ह्यात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तीन दिवसीय दौऱ्यावर

1

प्रतिनिधी : चेतन एस. चौधरी

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्त तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा मागोवा घेतला. नंदुरबार शहरातील जेपीएन हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला त्यांनी भेट दिली. जिल्ह्यातील अक्कलकुवा, खापर, तळोदा शहरांना त्यांनी भेट देऊन, विविध संघटना, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी खासदार डॉ. हिनाताई गावीत, आमदार अशोक उईके, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
.