शितल वासुदेव  तोटे हिने फवारणी सुरक्षेबाबत केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मागील दोन वर्षांपासून फवारणीमुळे विषबाधा  होऊन अनेक शेतकऱ्यांचा  मृत्यू ओढवला. यावर्षी नुकताच यवतमाळ जिल्ह्यात शेतात  फवारणी करताना विषबाधा  होऊन मृत्यू झाल्याचा घटना घडली. अशा घटना घडू  नये या बाबत शेतकऱ्यांनी वेळीच कोणती दक्षता घ्यावी, याबाबत रावेरी येथील शेतकरी दामोधररावजी हिवरे यांच्या शेतावर जाऊन पिकावर शेतात सुरक्षित फवारणी कशी करावी, याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कीटकनाशकांचे योग्य मिश्रण फवारणीपूर्वी करताना कसे तयार करावे याचे मार्गदर्शन शितल वासुदेव  तोटे यांनी करून दाखवले.कीटकनाशके फवारताना संरक्षण किट घालावी, नाक व तोंडावर मास्क वापरावा. कीटकनाशाचा डब्बा उघडताना  अवजारांचा  वापर करावा आणि कीटकनाशकचा रिकामा डब्बा जमिनीमध्ये खड्डा करून व्यवस्थित नायनाट करावा अशा संदर्भात माहिती दिली.
    यावेळी  कृषी महाविद्यालयाचे प्राचार्या सह अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.