
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ.
ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदाराकडून आर्थिक पिळवणूक होत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय व हक्क मागणी म्हणून ऊस उत्पादक संघर्ष समिती उमरखेड यांच्यावतीने दिनांक 11/ 10 /2023 ला सकाळी 11 वाजता रोज बुधवार कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद रोड उमरखेड येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी सभेला उपस्थित राहण्याची आव्हान समितीतर्फे करण्यात आली आहे. कारखानदारांनी ऊस तोडणी पूर्वी प्रति टन उसाचा भाव जाहीर करण्यात यावा तरच ऊस उत्पादक शेतकरी गळपासाठी ऊस देईन. सन 2023 -24 च्या गळीप हंगामा प्रति टन चार हजार रुपये ऊस दर देण्यात यावा व 3200 रुपयांचा पहिला हप्ता देण्यात यावा ऊस गाळप झाल्यानंतर पंधरा दिवसात उर्वरित रक्कम देण्यात यावी. ऊसतोड कामगाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी सर्व साखर 2022 /23 गळीपहंगामाचा जास्तीत जास्त ऊस प्रति टन भाव देणाऱ्या कारखान्याच्या बरोबरीचे रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी. उसाची लागवडची नोंद व ऊस तोडणी ची तारीख ऑनलाईन मोबाईल ॲप द्वारे देण्यात यावी . या विविध मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची आव्हान समितीतर्फे करण्यात आले आहे.