राळेगाव तालुक्यातील वरध येथे विज पडुन एक बैल ठार व गाई ला आस

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वरध येथील शेतकरी जयप्रकाशभाऊ पुरुषोत्तम रागेनवार गट नंबर २६८ रा. वरद या शेतकऱ्याच्या शेतात 10 सप्टेंबर रोजी बैलावर वीज पडून बैल जागीच ठार व गाईला आस लागण्याची दुर्देवी घटना घडली.
या घटनेत जयप्रकाशभाऊ रागेनवार यांचा बैल विज पडुन जागीच ठार झाल्याने या शेतकऱ्याचे अंदाजे 50 ते 60 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते.