
पाटबंधारे विभागाने अमल नाला वेस्ट वेयर जवळ असलेल्या डोहाजवळ पर्यटकांना जाण्यास सक्त बंदी घालून तशे फलक वेस्ट वेयर परिसरात लावले आहे. आदेशाचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करण्याची ताकीद पोलीस विभागाने दिली आहे.
अमलनाला धरण पूर्ण भरून वेस्ट वेअर सुरु झाला तेव्हा पासून सारखी पर्यटकांची संख्या वाढली आहे. प्रसिद्ध झालेल्या अमल नाला ओव्हरफ्लो धबधाब्यावर जाऊन विहंगमय दृश्य पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत आहेत. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. पाण्यात भिजून मनसोक्त आनंद लुटतात, मात्र नव्युवकांच्या अतिउत्साह दाख्वत खोल पाण्यात उतरल्यामुळे एका महिन्यात 3 युवकांना जलसमाधी मिळाली आहे.
14 सप्टेंबर ला 2 युवकाचा बुडून मृत्यू होताच प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ 15 सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सिंचाई विभागाचे अभियंता सय्यद अमीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यटकांना दुर्घटना स्थळी जाण्यासाठी बंदी घातली व तशा प्रकारचे फलक पोलीस प्रशासन ने लावले आहे. लगेच दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाने प्रतिबंध दर्शविणारे बोर्ड लावले आहे. येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांनी त्या दुर्घटना घडल्या ठिकाणी असलेल्या डोहाकडे जाण्यास प्रतिबंध लावले आहे.
