करंजी ( सो ) ग्रामवासीयांकरीता आनंदाची वार्ता

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दि २४/०९/२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय करंजी ( सो ) येथे सकाळी १०.३० वाजता आवास प्लस ( पत्रक ड ) ( घरकुल )पात्र व अपात्र नागरिकांची यादी पंचायत समिती राळेगाव यांचे सुचने नुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आली.
शासना कडून प्राप्त झालेल्या यादी नुसार २१३ लाभार्थी पात्र ठरले व ११ लोक अपात्र झालेले आहे .
यादी प्रसिध्द झाल्यावर गावातील लाभार्थी नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते .
यावेळी सरपंच प्रसादभाऊ कृष्णराव ठाकरे,उपसरपंच अनिलभाऊ गुलाबराव कोडापे,ग्रामरोजगार सेवक चेतनजी वाभीटकर ,शिपाई वाल्मिकजी कोडपे,गावातील प्रतिष्ठित नागरिक सुधीरजी घुगरे,ताणबाजी चिंचोळकर,संजयजी शेडमाके,दिलीपराव ठाकरे व अनेक गावकरी उपस्थित होते.