भारत बंद च्या आव्हानाला सिडकोत प्रतिसाद.. सर्व पक्षीय विनंती फेरी संपन्न



केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्या विरोधात दिल्ली च्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल केंद्रातील मोदी सरकार घेत नसून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद ची हाक देण्यात आली होती.
त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,माकप, आप सह देश भरातील 19 पेक्षा जास्त संघटना आणि पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता.
शेतकरी आंदोलनात आज पर्यंत 600 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. ह्या ला जबाबदार बीजेपी सरकार ला जाग येण्यासाठी नविन नाशिक परिसरात बंद ची हाक देण्यात आली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून लवकरात लवकर हे कायदे रद्द होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.
त्रिमूर्ती चौक, पवन नगर, उत्तमनगर, मोरवाडी येथे फेरी काढण्यात आली.
सिडको मध्ये माकप नेते तानाजी आप्पा जायभावे, सिडको राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष मकरंद सोमवंशी, शिवसेना विभाग प्रमुख सुयश पाटील, आप चे सुमित शर्मा, युवक उपाध्यक्ष कृष्णा काळे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी वाघमारे माथाडी कामगार नेते मुकेश शेवाळे, युवा नेते भरत पाटील, इम्रान अन्सारी, देवेंद्र देशपांडे, सुरज चव्हाण, शिवम आलइ, आदी सिटू चे कामगार आणि नेते फेरीत सहभागी झाले होते.