
समुद्रपुर दि.०२ ऑक्टोबर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधुन आज दि.२ रोजी गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्ततावर महसुल विभागाच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत येथे करण्यात आले.
सदर अभियानाचे उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांचेसह उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले,तहसीलदार राजू रणवीर,जाम सरपंच सचिन गावंडे,उपसरपंच हेमराज खेडेकर, ग्रामविकास अधिकारी धोटे,तलाठी प्रेम ढवळे इत्यादिसह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे हे उपस्थित होते.
तालुक्यातील जाम येथील मागणी करण्यात आलेल्या जवळपास ४० शेतकऱ्यांना त्यांचे शेतीचे सातबाऱ्यांच्या उताऱ्यांचे आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी समुद्रपुर तालुक्यातील मंडल अधिकारी,तलाठी,महसुल कर्मचारी तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
