
समुद्रपूर:- महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान ((उमेद) कक्ष,समुद्रपूर अंतर्गत तलाठी कार्यालय समोरील प्रांगणात वर्धा वर्धिनी दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पंचायत समिती,समुद्रपूर सभापती सौ.सुरेखा ताई टिपले यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या
महोत्सवात तालुक्यातील कोरा,नंदोरी,गिरड,मांडगाव,कांढळी,समुद्रपूर गणातील उमेद अंतर्गत येणाऱ्या समूहाने घरी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थ, रांगोळी,स्टेशनरी, नैसर्गिक भाजीपाला,पशुखाद्य,पणती,दिवे अश्या विविधप्रकारचे खाद्य पदार्थ विक्री करिता आपल्या सेवेत आणले आहे,तरी 31 ऑक्टोबर व1 नोव्हेंबर कालावधीत जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे तालुका अभियान व्यवस्थापक निशाताई मेश्राम यांनी सांगितले,आरोग्य संबंधित माहिती, महिला सक्षमीकरण व दिवसेंदिवस महिलांनी स्वतःच्या बळावर केलेल्या प्रगतीचे ढगे मॅडम यांनी कौतुक केले.
तसेच महिलांनी वेळात वेळ काढून आपल्या कौश्यल्याच्या बळावर कुटुंबाला आर्थीक रित्या सक्षम बनविण्याचे काम योग्य प्रकारे करत असल्याचे कौतुक अध्यक्षीय भाषणात पंचायत समिती सभापती सौ.सुरेखाताई टिपले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामुदायिक पशुधन व्यवस्थापक प्रशांत शेवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाग व्यवस्थापक रामटेके यांनी केले,महोत्सव यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक दिनेश आरसे,विलास बोभाटे,लेखापाल धीरज मून,पंकज भगत तालुका समन्वयक राकेश पारधी,प्रभाग समन्वयक कोल्हे, बडोले,नुनावत, देवतळे,बुद्धेवार प्रभाग व्यवस्थापक खेळकर, बैलमारे,डंभारे मॅडम,पशुधन व्यवस्थापक गिरी,प्रभाग कृषी व्यवस्थापक पंकज गाठे,तालवटकर,वाघमारे व तालुक्यातील कॅडर यांचे सहकार्य लाभले.
