तिर्थक्षेत्र बोरगडी येथील सभागृहाचा लोकार्पण सोहळा जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न.. 👉🏻ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ, व कीर्तन सोहळ्याची समाप्ती..

हिमायतनगर प्रतिनिधी
तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगडी येथे मागील काळात माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून वै.साहेबराव (कृष्णा) यांच्या पुण्य समरणार्थ आयोजित केल्या कार्यक्रमात उपस्थित ह.भ.प. माधवमहाराज बोरगडीकर यांना दिलेला शब्द पूर्ण केला येथील भाविक भक्तांना भव्य असे सभागृह बांधून देतो असे माजी आमदार यांनी सांगितले होते त्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा दि.3 ऑक्टोंबर रोजी युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,कीर्तन सोहळ्याची समाप्ती करण्यात आली

या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील तीर्थक्षेत्र मौजे बोरगडी येथे मागील 27 वर्षा पासून वै.साहेबराव (कृष्णा) यांच्या पुण्य समरणार्थ मी.भा.सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ,हरिपाठ कीर्तन सोहळा आयोजित केला जातो या निमित्याने उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करतांना ह.भ.प.माधव महाराज यांनी असे सांगितले शेवटी ” माणसाचे देह नाशवंत आहे पण त्यांनी केलेले कार्य हे नेहमी समारणार्थ राहिले पाहिजे ” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी तीर्थक्षेत्र बोरगडी येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य सभागृहाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर,ह.भ.प. माधवमहाराज बोरगडीकर,नगराध्यक्ष कुणाल राठोड,शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांच्या हस्ते दि 3 ऑक्टोंबर रोजी संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमाचे विनीत ह.भ.प. माधवमहाराज बोरगडीकर व मंदिर कमिटीने व शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेले युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील व नगराध्यक्ष कुणाल राठोड, बळीराम देवकत्ते, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे,उप तालुका प्रमुख विलास वानखेडे, संटी कप्पलवाड, अनिल भोरे,पांडुरंग इंगळे,अभिजित चंदेल, सह पत्रकार नागेश शिंदे यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेत्यानंतर उपस्थित गावकऱ्यांनी आयोजित कार्यक्रमाच्या समाप्ती नंतर महाप्रसादाचा लाभ घेतला