बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या. लहुजी शक्ती सेनेचे मागणी

हिमायतनगर / परमेश्वर सूर्यवंशी.

लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर च्या group ला जॉईन होण्यासाठी

खाली क्लिक करा

https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1

.नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका झोपडपट्टी बिलोली येथील सुनीता कुडके या 27 वर्षीय अनाथ आणि मूकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेल्या बलात्कार, अत्याचार आणि खून प्रकरणी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुक्याच्या वतीने तीव्र जाहीर निषेध नोंदवला आहे.या अत्याचार आणि दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाला त्या घटनेत सोबतीला आणखीन काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. का याची सखोल चौकशी व्हावी तसेच या आरोपीला महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असलेला महिला अन्याय अत्याचार विरोधी कायदा म्हणजेच दिशा किंवा शक्ती कायद्याअंतर्गत 21 दिवसाच्या आत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने मा.तहसीलदार साहेब व मा. पोलीस निरीक्षक साहेब हिमायतनगर यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. त्यामध्ये कुठल्याही स्तरातील, कुठल्याही समाजातील, कुठल्याही जाती धर्मातील, मुली- महिला सुटलेल्या नाहीत, त्या अशा सर्वच घटना बद्दल “लहुजी शक्ती सेना यांनी आज तीव्र निषेध केला आहे आणि अशा घटना घडवणाऱ्या अपप्रवृत्तींना जबर बसवण्यासाठी किंवा नायनाट करण्यासाठी घटनेमधील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. या घटनेने सर्व महाराष्ट्रातील “स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचबरोबर सदरील पिडित महिला मातंग समाजातील असल्यामुळे लहुजी शक्ती सेना आणि मातंग समाज तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.करण्यात येते की ,या मूकबधिर मुलीवर अत्याचार प्रकरणातील अटक आरोपी तसेच चौकशीतून दोषी उत्पन्न होणाऱ्या सर्वच आरोपीं वरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जावा आणि या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अन्यथा, लहुजी शक्ती सेना राज्यभरा मध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतानी सांगितले व तहसीलदार तहसील कार्यालय हिमायतनगर येथे निवेदन देऊन सादर केले आहे.या वेळी
विकास गाडेकर, प्रदीप तपासकर, तानाजी गाडेकर, दयानंद वाघमारे, मोतीराम जळके, गंगाधर गायकवाड, प्रशांत महाजन, साहेबराव मांजरमकर, उपस्थित होते.