
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी)
तालुक्यातील मौजे आंदेगाव परिसरात अवैध दारू विक्री सह जुगार आड्डे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे परिसरातील अनेक नव तरुण युवक व्यसनाधिनतेकडे वळत आहेत तेथील अनेक कुंटुब व्यसनाधीनते कडे जाऊन ते उध््वस्त होत आहेत. त्या विरोधात आंदेगाव येथील महिलांसह ग्रामस्थांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक देवकते साहेब यांना भेटून एक लेखी निवेदन देऊन गावात होत असलेली अवैध दारू विक्री सह जुगार आड्डे तात्काळ बंद करावे अशी मागणी केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील आंदेगाव येथे अवैध दारूची राज रोस पने विक्री करणाऱ्यांना पोलिसांचाच वदरहस्त असल्यामुळे त्यांनी आपले डोके वर काढत आहे त्यामुळे गावातील अनेक महिलांचे संसार मोडकळीस येत आहेत गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरोधात कुणीच आवाज उठवत नाही गावात बऱ्याच नवतरुण युवकांन मध्ये भांडण-तंटे होत आहेत व अनेक घरातील माणसे दारू पिऊन रात्रीला महिलांना मानसिक त्रास देऊन मारहाण करत आहेत त्यामुळे येथील महिलांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात येऊन पोलिसांना भेटून येथील दारू विक्री तात्काळ बंद करा अशी मागणी केली व गावात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या विरोधात तात्काळ कारवाई करून आम्हा महिलांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी उपस्थित आंदेगाव येथील सरपंच आम्रपाली उत्तम राऊत, सौ.राधाबाई रामजी काईतवाड, सौ गयाबाई सुभाष नरवाडे , सौ.चंद्रकलाबाई तुकाराम अंनगुलवार, सौ मिनाबाई अप्पाजी मिराशे, विमल बाई कोंडबा मिराशे, सरस्वतीबाई आलेवाड, गंगाबाई दिगंबर आचरवाड, अनुसया देवन्ना पोलसवाड, चंद्रभागा सुधाकर , लक्ष्मण रामा बकेवाड, सुभाष गटकपवाड, उत्तम राऊत ,रुपेश आनंदराव भुसावळे, रामेश्वर लक्ष्मण पाकलवार, सतीश आनंदराव भुसाळे ,संतोष पंडीत मिराशे ,राजु दिगंबर भुसावळे ,बालाजी मिराशे ,अविनाश भुसावळे सह आंदेगाव येथील आदी महिला व पुरुष मंडळी यावेळी उपस्थित होते
