वाटेफळ येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

बालाजी भांडवलकर
लोकहित महाराष्ट्र न्युज, परंडा तालुका प्रतिनिधी


वाटेफळ(परंडा तालुका प्रतिनिधी): संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.कठीण काळात रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन वाटेफळ गावचे विद्यमान उपसरपंच मा.संतोष भांडवलकर यांनी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “विश्वजन आरोग्य सेवा समिती धाराशिव व वाटेफळ ता परंडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १० आँक्टोबर रोजी हनुमान मंदिरात करण्यात आले”.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ राज्यासह विविध ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासु नये या अनुषंगाने तरुणामध्ये रक्तदानचे महत्व समजून त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करुन संतोष भांडवलकर मित्र परिवार व ग्रामस्थांनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचा प्रारंभ सकाळी १०:००वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरीकांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून झाली.

मा.तंटामुक्ती अध्यक्ष ,प्राचार्य नारायण भांडवलकर सर यांनी रक्तदानासाठी तरुणांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा व देशहितासाठी गरजुवंत रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे .व एका मानवाने दुसऱ्या मानवाचा रक्तदानाने जीव वाचवण्यासाठी सामान्य जनतेला आपल्या वतीने एक छोटीशी मदत होईल .असे आवाहनात्मक साद घातली.यावेळी गावातील तरुणासह आसपासच्या गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी विश्वजन आरोग्य सेवा समितीचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष सोमनाथ कोकाटे यांनी रक्तदानाचे फायदे व महत्व पटवून दिले.सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात मिळावा म्हणून वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे रक्त संकलन करण्यासाठी आलेल्या “भगवंत रक्तपेढी बार्शी जि.सोलापूर” येथील डॉक्टर व कर्मचारी वर्ग यांनी अपेक्षा व्यक्त करुन डोनर दात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला व सहकार्य केले.
रक्तदान शिबिराला प्रोत्साहन देण्यासाठी गावचे पोलिस पाटील ,परंडा पं.स.मा.सदस्य दिपक भांडवलकर,वाटेफळ ग्रामपंचायत आजी -माजी सरपंच-उपसरपंच सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद भांडवलकर तहसील कार्यालय भुमचे अधिकारी नितीन भांडवलकर साहेब, जय हनुमान विद्यालयाचे कर्मचारी वर्ग, पत्रकार बांधव,विविध क्षेत्रातील मान्यवर,संघटना, व्यावसायिक ,गावासह पंचक्रोशीतील नागरिक,सर्वच ऐच्छिक रक्तदाते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.