ग्रामपंचायत कडून सॅनिटायझर फवारणी,घरीच राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर, परांडा

वाटेफळ ग्रामपंचायत कडून कोरोना (covid-19) साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बुधवार (दि.२८) रोजी गावात व वाडीवस्तीवर सँनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरणचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. याप्रसंगी परंडा तहसीलचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर पंचायत समिती परंडा गटविकास अधिकारी अंधारे साहेब व उपजिल्हा रुग्णालय परांडाचे वैद्यकीय अधिकारी पठाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मा पंचायत समिती सदस्य सरपंच प्रतिनिधी दीपक भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज भांडवलकर ,ग्रामपंचायत कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते सँनिटायझर फवारणी व निर्जंतुकीकरण करण्याबाबत ग्रामपंचायतीने “माझा गाव माझी जबाबदारी” संदर्भात सोमवारी दिनांक २६ रोजी आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेऊन बुधवार (दि. २८) रोजी संपूर्ण वाटेफळ गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील नागरिकांना मास्क, व सँनिटायझर वापर, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले. असून ,नागरिकांनी नियमांचे नियमित काटेकोर पालन करावे असे आवाहनही करण्यात आले. कोरोना काळात गरजेनुसार कोरोना विलगीकरण कक्षासह कोरोना सेंटर ची गरज भासल्यास ग्रामपंचायत च्या वतीने प्रस्ताव तयार करून आरोग्य विभाग, तहसील कार्यालय ,किंवा पंचायत समितीकडे पाठविण्याचे आदेश तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला दिले.
जिल्हा परिषद उस्मानाबाद आरोग्य विभागामार्फत मोफत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी ,आयुर्वेदिक औषधी गोळ्या आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत घरोघरी जाऊन वाटप करण्याबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी या अनुषंगाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याची थर्मल गन च्या साह्याने व्यक्तीला ताप आहे का, कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी गन द्वारे तपासणी केली.

‘सर्वांनी ‘घरी रहा सुरक्षित रहा’ कोरोनाला न घाबरता सर्वांनी भयमुक्त निरोगी सकारात्मक राहा .व विनाकारण अफवा पसरवून एखाद्या व्यक्तीला त्रासदायक होईल असे गैरसमज पसरुन गावातील वातावरण दुषित करण्याचा कोणीही प्रयत्न करु नका असे दिपक आबा भांडवलकर यांनी नागरिकांना आवाहन केले.’