
प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर
परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.जयसिंग विठ्ठल भांडवलकर तर उपाध्यक्षपदी श्री नितीन कल्याण भांडवलकर व ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीधरवाडी(वाटेफळ) च्या अध्यक्षपदी श्री.रंजित परमेश्वर भांडवलकर व उपाध्यक्ष म्हणुन सौ.मोनाली बालाजी भांडवलकर या चौघांची सशर्त सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज राज्यातील विविध ठिकाणी पोलीस, महसूल, शिक्षण, डॉक्टर, बँक, उद्योजक ,भारतीय सैन्यात ,नौदलात व व्यवसाय या क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असून चांगल्या प्रकारे काम करत आहेत,
जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी असताना गावातील शाळेचा नावलौकिक तालुक्यात व्हावा, यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या अध्यक्षाची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी व उद्याचे सजग नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होईल, विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य प्रतिनिधी योग्येते पर्यंत हे अध्यक्ष नक्कीच पोहोचतील व पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या सह शाळेच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी अविरत कार्य करतील असा विश्वास कोविड योद्धा डाँ.भांडवलकर समुहातील स्वंयसेवी सदस्यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचित सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच सदस्य यांचा वाटेफळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती परंडा सभापती श्री.सतीश दैन,पंचायत समिती मा.सदस्य व वाटेफळ ग्रामपंचायत विद्यामान सरपंच श्री दिपक भांडवलकर ग्रामपंचायत आजी-माजी सरपंच, उपसरपंच,सदस्य ,जय हनुमान विद्यालयाचे प्राचार्य श्री खोबरे सर ,निवृत्त.प्रा.नारायण सर, निवृत्त कर्मचारी बाबुराव भांडवलकर सर्व कर्मचारी वृंद, जि.प.प्रा.शाळा वाटेफळ चे मुख्याध्यापक श्री मेदने सर ,जि.प.प्रा.शाळा श्रीधरवाडी(वाटेफळ)चे मुख्याध्यापक व दोन्ही शाळेचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच तहसील कार्यालय भुम चे अधिकारी श्री नितीन भांडवलकर साहेब,पोलिस पाटील ,मुगावचे सरपंच समाधान गरदाडे विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर शिक्षणप्रेमी गावातील नागरीक उपस्थित होते.
नवनिर्वाचित सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांना मा.प्राचार्य नारायण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
