ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक वाटेफळ

प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर,परांडा

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय नेते, पुढारी स्थानिक कार्यकर्ते यांनी आपल्या आपल्या पद्धतीने मोर्चेबांधणीला वेग दिला. यामध्ये अपक्षांनी देखील उडी घेत आपली मोट बांधली. वाटेफळ गावचा एक कुतूहलाचा विषयी तालुक्यासह जिल्ह्याला ज्ञात आहे राजकारण हे ज्या त्या ठिकाणी बाजूला ठेवून मतदारसंह उमेदवार देखील मन मोकळे आपुलकीने मिळून-मिसळून निवडणूक कार्यकाळात राहतात कधीच अनुचित प्रकार गैरवर्तन भांडण-तंटे घडू नये व आदर्श आचारसंहितेचा भंग होऊन त्याला गालबोट लागेल असा कधीच गैरप्रकार घडला नाही ही बाब आवर्जून उल्लेखनीय आहे.
वाटेफळ गावची एकूण मतदार संख्या 1870 एवढी आहे, यामध्ये महिला मतदारांची संख्या 844 ,तर पुरुष मतदारांची संख्या 1026 असून याची विभागणी तीन प्रभागांमध्ये विभागलेली आहे. एकूण नऊ सदस्य संख्या असलेली वाटेफळ ग्रामपंचायत ही जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल मधील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. राजकीय पार्श्‍वभूमी असलेले वाटेफळ गाव नेहमीच कुठल्यातरी कारणाने जिल्ह्याला नाव गाजणारं गाव आहे. गतवर्षी ची निवडणुकी मोठी रंगतदार राहिली. एकंदरीत गेल्या पंचवार्षिक निवडणूकी पेक्षाही ही निवडणूक जराशी वेगळे आहे. नऊ जागेसाठी एकूण 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी तीन अपक्ष, वाटेफळ ग्राम विकास आघाडी पॅनल तर्फे एकूण आठ , कुलस्वामिनी जगदंबा ग्राम विकास आघाडी कडून 8 ,यापैकी अपक्षाकडून एक उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला नऊ जागेसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत .यामध्ये दहा महिलांमध्ये एक सर्वात वयोवृद्ध महिलाअपक्ष उमेदवार आहे, आठ पुरुषांपैकी एक अविवाहित पुरुष आपले नशीब आजमावत आहेत. बिनविरोध निघालेली एक महिला उमेदवार देखील कसोटीला उतरले आहेत. शनिवार दिनांक 09 .01.2021 रोजी वाटेफळ ग्राम विकास आघाडी व रविवार दिनांक 10.01.2021 रोजी कुलस्वामिनी जगदंबा ग्राम विकास पॅनल अनुक्रमे दोन्ही च्या वतीने पायी प्रचारफेरी काढून गाजत वाजत हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
दोन्ही प्रमुख पॅनल च्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन दाखवण्यात आले. या निवडणुकीत तीन महिला गेल्या पंचवार्षिक ला निवडून आलेल्या अनुभवी उमेदवार आहेत .यापैकी एक “सरपंच, उपसरपंच, व सदस्य” असा त्यांचा प्रवास राहीला आहे, तर बाकीच्या सर्व नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी बहुतेक सर्वच नेते मंडळी ची ईर्ष्या पणाला लागली आहे . यामध्ये साम,दाम,दंड, भेदासह बळाचा वापर होऊन बाजी मारणार कोण? वाटेफळ गावच रणांगण यावर्षी खुपच काही नवीन नक्कीच शिकून गेलं आहे यामधून मोठा बोध आला आहे असे उद्गार तरुणांच्या तोंडामधून ऐकावयास मिळतात. अपेक्षेप्रमाणे या वर्षी तरुणांची विशेष प्रचारात सहभागी होण्याची संख्या खूप कमी प्रमाणात दिसून आली. का कुणास ठाऊक आजच्या तरुणांना राजकारणात रुची दिसेना?रोजगारासह उद्योग-व्यवसायात आजचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात गुंतला आहे, त्यामुळे हा आभास भासत असावा का?