
उस्मानाबाद प्रतिनिधी:-बालाजी भांडवलकर(९८२२१७००४३)
परंडा तालुक्यातील वाटेफळ येथे दि.३१/१२/२०२१ रोजी हिंदुस्थान कॅटल फिडस बारामती व क्रांतिसिंह दूध संकलन केंद्र वाटेफळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीधरवाडी व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाटेफळ मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ०५ वह्यांचे (रजिस्टर) मोफत वाटप करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान कॅटल फिडस् बारामती चे पदाधिकारी मा. श्री गुणवर साहेब, चौधरी साहेब, डॉ. बोरुड साहेब व शिंदे साहेब तसेच क्रांतीसिंह दुध संकलन केंद्राचे चेअरमन श्री.कृष्णा भांडवलकर मार्फत ; मा. प. स. सदस्य विद्यमान सरपंच श्री.दिपक भांडवलकर, उप सरपंच संतोष भांडवलकर ग्रा.पं.सदस्य पोलिस पाटील. , मा. प्राचार्य.श्री.नारायण सर भांडवलकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयसिंग भांडवलकर , रंजित भांडवलकर ,उपाध्यक्ष नितीन भांडवलकर (पाटील)सौ.मोनाली भांडवलकर,व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
हिंदुस्थान कँटल फिडस फिडस ही दर्जेदार व पौष्टिक पशुखाद्य उत्पादन करणारी अग्रेसर कंपनी असुन कंपनीचे सर्व उत्पादने गायी, म्हशी व वासरांना पुर्ण क्षमतेने वाढीसाठी व आरोग्यासाठी उत्तम प्रतवारीप्रमाणे व दुध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना वाजवी व अल्प दरात खिशाला परवडणारी सेवा देणारी कंपनी असुन ,कंपनीच्या नफ्यातुन चँरीटेबल ट्रेस्ट फंडामार्फत सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक शालेय विद्यार्थी हे सर्वच सदन घरातील नसतात ,अर्थिक अडचणी अभावी बऱ्याचशा होतकरू व हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सदैव हिंदूस्थान फिडस च्या माध्यमातुन सामाजिक सलोखा जोपासन्याचे कार्य अविरतपणे गरजूपर्येत पोचण्यासाठी तत्पर आहेत.यापेक्षाही आणखीन पुढील वर्षी वेगळा उपक्रम राबविण्याचा कंपनीचा मानस आहे असे मत श्री.गुणवर साहेब यांनी व्यक्त केले.
क्रांतीसिंह दुध संकलन केंद्रामार्फत नेहमीच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर समाजातील विवंचनेत असणाऱ्यांना मदतीचा हात देण्याचे पुण्य काम करु असे आश्वासन चेअरमन कृष्णा भांडवलकर यांनी व्यक्त केले .
या सामाजिक उपक्रमावेळी
उपस्थित दुग्ध उत्पादक शेतकरी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरीकांनी हिंदुस्थान फिडस कंपनीचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे
आयोजन क्रांतिसिंह दूध संकलन केंद्र चे चेअरमन श्री कृष्णा भांडवलकर यांनी केले होते. यावेळी जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे प्रा.श्री खोबरे सर , वाटेफळ जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री मेदने सर व श्रीधरवाडी जि. प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री गुळवे सर यांनी आभार व्यक्त करुन अपेक्षा व्यक्त केली.
