


प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर, परांडा
ता.२६ फेब्रुवारी२०२१रोजी परंडा तालुक्यातील वाटेफळ गावातील संतोष लक्ष्मण भांडवलकर यांची पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. गेले सात-आठ वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी सेवा केली परंतु त्यावर ते न थांबता स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन अथक परिश्रमाने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन एक जबाबदारीच्या पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली .गावातील प्रथम पोलीस उपनिरीक्षक पदाचा मान त्यांना जातो .तसेच प्रशासनात प्रदीर्घ काळ अभियंता म्हणून सेवा देणारे वाटेफळ येथील सुभाष चांगदेव लांडे यांची उपविभागीय अभियंता पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .यावेळी वैद्यकीय क्षेत्रात विशेषता: कोरोना महामारी च्या काळामध्ये रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर बाबुराव अनंता भांडवलकर यांचा “कोविड योद्धा “म्हणून सत्कार करण्यात आला. या तीनही सुपुत्रांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. म्हणून वाटेफळ ग्रामस्थांच्या व जय हनुमान विद्यालयाच्या वतीने भव्य नागरी गौरव समारंभ करण्यात आला.
” केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे” या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या जीवनात आळस झटकून देऊन कामाला लागा मग तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत एक दिवस नक्कीच पोहोचाल असे कोणतेच कार्य नसेल अथक प्रयत्नांनी शक्य होणार नाही. कर्माचे आणि प्रयत्नांचे महत्त्व विद्यार्थीदशेतच समजले पाहिजे. अनेक संत ,महापुरुष ,अधिकारी प्रयत्नाने महान बनू शकले .त्यासाठी आपले जीवन उद्दात बनवण्यासाठी आणि उत्तम प्रकारे समाजात सन्मानाने जगण्यासाठी चांगल्या वाटाड्या चे मार्गदर्शन उत्तम प्रकारे लाभणे गरजेचे आहे .आज मी या पदापर्यंत न डगमगता मोठ्या उमेदीने ,चिकाटीने अथक परिश्रमाने व कुटुंब मित्रमंडळी आणि मार्गदर्शक सहकाऱ्यांची या यशामध्ये मोलाची साथ मिळाली .असे सत्काराला उत्तर देताना पीएसआय संतोष भांडवलकर यांनी सांगितले.
सुभाष लांडे यांनी देखील त्यांच्या शालेय जीवनापासून ते आतापर्यंत घडलेल्या वास्तविक जीवनाचा अनुभव मोठ्या गंमतीने मांडला.
या नागरी गौरव सोहळ्यास गावातील लहान मोठे विविध क्षेत्रातील नागरिकांसह युवक, शालेय विद्यार्थी ,कर्मचारी ,संस्थेचे पदाधिकारी ,ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य, पत्रकार आवर्जून उपस्थित होते.
