
प्रतिनिधी:-बालाजी भांडवलकर,उस्मानाबाद
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी सांप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.अनेक वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने ०३जानेवारी २०२३पासून परंडा तालुक्यातील वै. संत भगवान बाबा ,वैसिद्ध संत सिताराम बाबा उंडेगावकर, फुलगिर बाबा यांच्या आशिर्वादाने पावन भुमीत.वैराग्य मुर्ती महंत संतोष महाराज गिरी ह.भ.प.राधाताई भांडवलकर ,धर्मराज पाटील,मोहन भांडवलकर, बापुकाका,रावसाहेब भांडवलकर मोहिते सर व इतर गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी वाटेफळ गावात ह.भ.प.मुरलीधर होनकळस महाराज,ह.भ.प.हनुमंत (भाऊ)भांडवलकर व सर्व वारकरी टाळकरी ,गावकऱ्यांच्या शुभहस्ते वीणा पुजन करुन अखंड हरिनाम सप्ताहात प्रारंभ होत आहे…नामवंत दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने, प्रवचने महिला भजनाची मधुर वाणीतून सेवा होणार आहे. पहाटे काकडा आरती,विष्णुसहस्रनाम ,ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन, भारुडे, प्रवचन , सायांकाळी हरिपाठ आणि रात्री किर्तन नंतर सामुदायिक हरीजागर केला जातो. असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम असतो. महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आजतागायत चालू आहेत.सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदायाची उपासना आहे. या सात दिवसात संतांचे अखंड नामचिंतन असेल .
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देईल भेटी ॥
रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी रोज महाप्रसाद व आध्यात्माचा लाभ घ्यावा असे आवाहन वाटेफळ सप्ताह कमेटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
