हातातोंडाला आलेल्या पीकाची डोळ्यासमोर झाली राख,बारा एकरातला ऊस जळुन खाक.

वाटेफळ:-(बालाजी भांडवलकर तालुका प्रतिनिधी) ता.२०आँक्टोबर२०२१रोजी,
वाटेफळ साठवण तलावाच्या भरावाच्या खालील बाजूला शेतकरी मारुती मोहिते गट नंबर ११७ क्षेत्र ३-५भुजंग मोहिते ग.नं ११५:६४आर,शिवाजी मोहिते ग.नं.११५:६४आर,लक्ष्मण मोहिते, आजिनाथ मोहितेग ग.न.११४, मच्छिंद्र मोहिते११८:१००आर या बांधवाच्या शेतीतील उभ्या ऊसाला दुपारी १२:४५वा.च्या सुमारास आचानक आग लागल्याची घटना थोड्या अंतरावर शेळ्या चारणाऱ्या इसमांच्या प्रथम दर्शी निदर्शनास आली .आग महावितरणच्या बसवण्यात आलेल्या ट्रान्सफर पासुन आगीला सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी आरडाओरडा करुन मोबाईलवरुन आसपासच्या शेतकरी व नागरिकांना कळविले .लोकांचा जमाव होईपर्यंत वाऱ्याच्या वेगाने आगीने रौद्र रूप धारण करून मोठ्या प्रखरतेने आगीच्या ज्वाला वाऱ्याने या फडातुन त्या फडात धुमसत राहील्या .यामध्ये शेतकऱ्यांच्या पाईप ,ठिबक केबल आणखी बऱ्याच शेतीसाहीत्यासह ऊस खाक झाला .

हातातोंडाशी आलेले उभ पिकांची अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत राखरांगोळी होवुन लाखो रुपयांचे नुकसान झाले .आग आचानक इलेक्ट्रिक शाँर्ट सर्किट मुळे लागली आहे असे म्हणणे शेळी चारणाऱ्या व्यक्तीचेआहे.नागरीकांनी आग विझविण्यासाठी जवळजवळ तीन तास प्रयत्नाची पराकाष्ठा केली .पण आग एवढी मोठी होती की त्या दाहकतेमुळे लोकांना आग आटोक्यात आणने मुश्कील झाले.बाजूला आणखी बरीच हेक्टर ऊसाची शेती होती .काही सजग नागरिकांनी सावधगिरीने ऊसाची तुट करुन पुढील व आजुबाजुच्या ऊसाला वाचण्यासाठी शर्तिचे प्रयत्न केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून गेल्यामुळे ,घटनेची माहिती समजताच परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली यावेळी नुकसान पाहून उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.
काही शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज ,खाजगी सावकाराकडून व्याजाने ,हात उसने पैसे घेऊन ऊस शेती पोटच्या लेकराप्रमाणे जोपासली होती. आशा आकस्मित घटनेमुळे आता आम्ही लोकाची देणी, बँक कर्जाची परतफेड कशी करावी? आगीच्या भक्ष्य ठरलेल्या ऊस उत्पादन शेतकऱ्यांना चिंता आहे.