
3
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा कळमनेर या गावातील नामे सुधाकर नान्हे यांच्या मालकीच्या नऊ बकऱ्या दिनांक 24/10/2021च्या रात्री अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे, बकऱ्या चोरायला आलेल्या चोरट्यांनी बकऱ्या चे मालक सुधाकर नान्हे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून दिले तसेच त्यांच्या घरी असलेली मोटारसायकल पंचर करून त्यातील पेट्रोल सुद्धा पूर्णपणे काढून नेले व बकऱ्या घेऊन पोबारा केला सदर बकऱ्या चोर हे बकऱ्या चोरून नेण्याकरिता पांढऱ्या कलर च्या फोर व्हीलर गाडीने आले होते अशी माहिती बकऱ्या मालक सुधाकर नान्हे यांनी प्रसार माध्यमांना दिली,
