उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडर अडगडीत ,गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवरच

  • Post author:
  • Post category:इतर

दरवाढीचा परिणाम

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा घुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या असुन रिकामा सिलेंडर अडगळीत गेला आहे.

ग्रामीण भागातील महिलांना धुरा पासून मुक्ती देण्यासाठी आणि प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने सन २०१६ मध्ये संपूर्ण देशात उज्चला गॅस योजना सुरु केली. या योजनेला ग्रामीण महिलांनी भरघोस पाठींबा दिल्याने अल्पावधितच ही योजना लोकप्रिय ठरून अनेक महिलांची धुरा पासून मुक्ती झाली. आता मात्र या योजनेच्या लाभार्थी असलेल्या गरीब कुटुंबांना गॅसच्या वाढत्या किंमती परवडणाऱ्या नसल्याने गॅस सिलेंडर अडगळीत टाकुन चुली पेटवाव्या लागल्या आहे.