
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव जुन्या पिढीतील सेवाभावी डॉक्टर तालुक्यातील होमिओपॅथी व बायोकेमिकल चे अभ्यासक अल्पदरात सेवा देणारे सदेशे चे अभ्यासक ग्रामस्थ डॉ नारायणराव मुकुंदराव हिवरे यांचा ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या सेवा कार्याबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या काळातील डॉक्टर मंडळी डॉ.अरविंदराव निलावर. डॉ सुशिला उजवणे. माजी प्राचार्य हनुमानराव केळझरकर. वामनराव तेलंगे सर . डायाभाई कारिया. प्रभाकरराव गवळी. भाऊराव पिंपरे. प्रा राधेश्यामजी चौधरी .सरपंच राजेंद्रभाऊ तेलंगे. बंडूजी निखाडे व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांच्या सेवा कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
