
वरोरा:– तालुक्यातील गिरसावळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे, मोठे मोठे खड्डे पडले आहे तरी या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित प्रभाकरराव कुडे यांनी निवेदन दिले तरी या प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता व रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे खड्ड्यात दिवे लावुन दिवाळी साजरी करण्यात आली व या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे यांच्या तालुक्यांतील खड्ड्यांचा प्रश्न घेउन अनेक दिवसापासून बांधकाम विभागाला मागणी करत आहे तरी या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही आता रस्त्यांचे काम चालू न झाल्यास आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला. गिरसावळी येथील सामजिक कार्यकर्ते जयंत चौधरी, नरेश घोडमारे, हिम्मतराव वैद्य, रवींद्र झूजूरकर, नगाजी गिरसावडे, प्रफुल पिदुरकर , रोशन भोयर व कार्यकर्ते उपस्थित होते.
