एम .एस .ई .बी. चा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या माथी या कडे लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक 18/ 11 /2021 रोजी राळेगाव एम एस ई बी अंतर्गत येणाऱ्या गावांची शेतात शेतात विज पुरवठा करणाऱ्या डीपी चा विज पुरवठा एम. एस .ई बी. च्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कुठलीही शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आलेला आहे. सध्या शेतकऱ्याचे गव्हाची पेरणी ,चण्याची पेरणी ,व इतर कपाशीवर तुरीला ओलीत आवश्यक असल्यामुळे त्यांना सध्या वीजपुरवठ्याची अत्यंत आवश्यकता आहे करिता शेतकऱ्यांना काही दिवसाची मोहलत घेऊन वीज पुरवठा जोडून द्यावा. ही सर्व शेतकऱ्यांची एम. एस .ई .बी .ला कळकळीची विनंती. तरी याकडे राज नेत्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्याची ही छोटीशी अट शेतकर्याची समस्या काढून टाकावी . अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, व्यापारी लोकांमुळे देश चालतो.. पण लॉकडाऊन मुळे कळलं की, शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतोय. आणि असेच शेतकऱ्यांच्या शेतातून वीज पुरवठा बंद केला जाईल तर नंतर शेतकरी शेतात काय पिकवेल तरी याकडे लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या हितासाठी या वीज पुरवठा अधिकाऱ्यांना चांगला धडा शिकवावा अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे.