धक्कादायक: शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला,महिला ठार

(प्राप्तमाहितीनूसार) पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कविटबोळी शेतशिवारात आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास कसरगठ्ठा येथील महिला नामे बेबिबाई हनुमान धोडरे वय ५५वर्ष हि कापूस वेचन्याकरीता स्वत:च्या शेतात गेली असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर महिलेवर हल्ला चढवून महिलेला ठार केले घटनेची माहिती वनअधिकार्यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृत महिलेला शवविच्छेदना साठी ग्रामीण रूग्नालय पोंभूर्णा येथे पाठविन्यात आले..सदर महिलेच्या पश्चात पती,मुलगा,सून नातवंड असून धोडरे परीवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे वाघाच्या हल्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून नागरीकामध्ये भीतीचे वातावरन पसरले असून नरभक्षी वाघाचे बंदोबस्त त्वरीत करावे अशी मागणी गावकर्यांन कडून होत आहे घटणास्थळी ठाणेदार जोशी साहेब,आर.एफ.ओ. खोब्रागडे मॅडम उपस्थीत होते