
राजुरा: चंद्रपुर येथे भरपुर लोकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळाच्या सहयोगाने परिवार विकास फाऊंडेशनतर्फे आरोग्यमिञ हेल्थ कार्ड चा प्रकाशन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते पार पडला. आरोग्यमिञ कार्ड चा लाभ प्रत्येक नागरिक घेऊ शकतो आणी आपले काही प्रमाणात पैसे बचत करू शकतो.या कार्डात कुटुंबातील पाच व्यक्तीचा समावेश असल्याने कुुटूंबाला थोड्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होते. सदर कार्ड जनतेत रूजु करून जनसेवा करण्याची संधी मिळावी हिच ईच्छा आहे.प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर आपल्या सेवेसाठी “आरोग्यमिञ हेल्थ कार्ड” उपलब्ध आहे, आपण आपल्या आरोग्याची काळजी करत असतो म्हनुन प्रत्येकांनी आरोग्यमिञ हेल्थ कार्ड चा अवश्य लाभ घ्या. या अनुषंगाने परिवार विकास फाऊंडेशन चे संचालक महेश भंडारे यांनी जनतेला आवर्जुन आव्हान केले.
याप्रसंगी प्रमुख मान्यवर डॉ.सिद्धार्थ पाटील,नागपुर डॉ.देव कन्नाके, डॉ.राऊत, मा.एकनाथ कनाके, मा.अशोक अंबागडे (,संचालक,ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ) सौरभ मादासवार, विवेक कांबळे,हेमंत ञिवेदी, प्रशिल भेसेकर,सागर कातकर, किसन बोबडे, राजु शंकरराव कुडे या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.
