शारदा फाउंडेशन च्या वतीनी बांधला वनराई बंधारा.

शारदा फाउंडेशन रजि. नंबर महा ८५५ पुणे च्या वतीने मौजा शिवापूर त. उमरेड जिल्हा नागपूर येथे वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन शारदा फाऊंडेशनचे अध्यक्ष मा श्री निकेश आमने-पाटील. यांच्या नेतृत्वाखाली शारदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री शुभम आमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. फाउंडेशन चे स्थानिक मार्गदर्शन महेश भाऊ भुयारकर ,गुणवंत मांढरे सर्व सदस्य नयन मत्ते यश तळनकर, राहुल शिवरकर, हितेश अमृ, जय डहारकर, हर्षल राऊत, हर्षल कावटे, हर्षल धुडसे यांनी आपली तत्परता दाखविली. शारदा फाउंडेशन उमरेड येथिल सहकार्याने बंधारा बांधण्याचे ठरविले. आणि नुकतेच शिवापूर या गावातील नियमित नाल्यावर शारदा फाउंडेशन च्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी महेश भाऊ भुयारकर व गुणवंत मांडरे यांनी गमतीजमतीत वनराई बंधाऱ्याचे महत्व पटवून देऊन फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे उत्साह वाढविण्याचे काम केले. यावेळी शारदा फाउंडेशन च्या उपक्रमात विशेष उपस्थिती मा. अजित चौधरी सरपंच ग्रा. प. शिवापूर यांची व सर्व फाऊंडेशनचे सदस्य यांनी श्रमदानातून वनराई बंधारा यशस्वी पने बांधण्यात आले.