
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
धामणगाव रेल्वे : कत्तलीकरिता गोवंशाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ३ लाख ७० हजार रुपयांचा गोरक्षण संस्थेकडे भरणा केल्यानंतर वाहतुकीसाठी या वापरण्यात आलेले वाहन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धामणगाव रेल्वे येथील न्यायालयाने आरोपीला रकमेचा भरणा करण्याचे आदेश दिले होते.
तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात गोवंश तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईमध्ये एमएच ४० वाय ०९५१ क्रमांकाचे वाहन • पोलिसांनी जप्त केले होते तसेच तसेच रेहान खान शब्बीरखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. धामणगाव रेल्वे येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण चालले. न्यायालयाने याप्रकरणी निकाल देताना जनावरांच्या पालन पोषणाचा खर्च ३ लाख ७० हजार रुपये गोरक्षण संस्थेला देण्याचे तसेच पाच लाख रुपयांचा एन्डेम्निटी बाँड देण्याचे आदेश दिले. रकमेचा भरणा केल्यास वाहनाची सुटका करावी, असेही न्यायालयाने म्हटले. त्यानुसार आरोपीने गोरक्षण संस्थेला ३ लाख ७० हजारांचा भरणा केला आहे. ही विदर्भातील पहिली घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी अॅड. आशिष राठी, अॅड. श्रुती मेहता यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, उपाध्यक्ष गिरीश मुंधडा, सचिव संजय राठी, सदस्य रवि टावरी, ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव, तळेगाव दशासर पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
