धक्कादायक:पत्यासारखी कोसळली प्रेक्षक गॅलरी,प्रेक्षक गंभीर जखमी

वरोरा शहरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यानुसार आज सायंकाळी कबड्डी मॅचेस सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने काही प्रेक्षक गॅलरी खाली दबल्याने गंभीर जखमी झाल्याने काही वेळासाठी गोंधळ माजला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.जखमी वर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .