
वडकी ते नागपूर हायवे रोडवरील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज शनिवार दि ४ डिसेंबर हा दिवस वडकी साठी अपघाताचा काळ ठरला असून दुपारी २ वाजताच्या सुमारास हेद्राबाद वरून वडकी मार्गे गोंदिया ला जात असलेले रहांगडले परिवार यांचे चारचाकी बलेनो वाहनाचा वडकी जवळ असलेल्या पुलावर गाडीचा समोरील टायर फुटल्याने अपघात झाला, प्राप्त माहितीनुसार वडकी ते नागपूर हायवे रोडवर टी,एस ०७ एफ एम ९७६४ या क्रमांकाची बलेनो गाडी वडकी गावाजवळ असलेल्या पुलावर गाडीचा समोरील टायर फुटल्याने गाडी ही डिव्हायडर वर जाऊन भिडली यात गाडी चालक मोरेश्वर रहांगडले वय 45 वर्ष यांचे डोक्याला मार लागला असून त्यांची पत्नी मनीषा रहांगडले वय 40 वर्ष हिला डोक्याला व पायाला जबर मार लागला असून गंभीर जखमी आहे यात त्यांचा मुलगा अथर्व रहांगडले याला कोणतीच दुखापत झाली नाही,हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचुर झाला होता,सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाही,जखमींना तात्काळ घटनास्थळावरून समोरील उपचारासाठी वडणेर येथे दाखल करण्यात आले असून घटनास्थळवर वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव सह पी एस आय मंगेश भोंगाडे पोलीस चिकराम दाखल झाले होते,या घटनेचा पुढील तपास वडकी पोलिस स्टेशन करीत आहे.
