
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रावेरी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीची निवड आज दिनांक ११/१२/२०२१ रोजी शालेय परिसरात घेण्यात आली त्यामध्ये पार पडलेल्या वर्गवार निवड प्रक्रियेत साहेबराव मेसेकर,सौ अंजली स्वप्निल पिंपरे,प्रमोद भुडे,विजय येऊकर, सौ सपनाताई शंकरराव हिवरकर, सौ सविता महिंद्र डायरे, तात्याभाऊ बोभाटे, वृषाली ज्ञानेश्वर बडे, मनिषा विष्णू मेश्राम यांची निवड झाली असून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून साहेबराव मेसेकर यांची पुनश्च निवड झाली असून उपाध्यक्ष म्हणून सौ अंजलीताई स्वप्निल पिंपरे यांची निवड झाली असून सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे श्रेय संबधित पालक वर्गाना देत असून गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
