हिंगणघाट शहरातील विकासकामांचे आ.समिर कुणावार यांचे हस्ते विविध सिमेंट रोडचे व समाज भवनाचे लोकार्पण संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत यशवंनगर येथील सायंकाळ हॉस्पिटल जवळील रोडचे भूमिपूजन , ज्ञानेश्वर वॉर्ड प्रभाग क्रमांक 4 मधील समाज भवनाचे लोकार्पण तसेच विविध सिमेंट रोडचे लोकार्पण सोबतच नगर परिषद विशेष अनुदान अंतर्गत दाऊदी बोहरा कब्रस्तान समाज भवनाचे लोकार्पण तसेच नगर परिषद विशेष अनुदान अंतर्गत गौतम वार्डमधील शहीद अब्दुल हमीद बहुउद्देशीय संस्था येथील समाज भवनाचे लोकार्पण मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
तसेच लोकार्पण समारंभ प्रसंगी आमदार समीरभाऊ कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर, नगर परिषद बांधकाम सभापती छाया सातपुते, नगरसेवक प्यारू भाई कुरेशी, भास्कर ठवरे, नगरसेविका शुभांगी डोंगरे, रवीला आखाडे , किरण राजेश धनरेल, बांधकाम विभागाचे प्रशांत धमाने व तळवेकर साहेब, हिंगणघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफिक भाई, भाजपा शहर अध्यक्ष आशिष पर्बत, समाजसेवक सुनील डोंगरे डॉक्टर सायंकाळ मॅडम, अरुण गोटेकर सर, ज्ञानेश्वर भागवते, पंकज देशपांडे , समाजसेवक श्यामभाऊ भिमनवार,संजयराव देहणे , किशोर रोंगे, सलीम बेगम मोहम्मद सलीम, असलम खान मोहम्मद खान, शेख अजीज शेख मोहम्मद, मोहम्मद हनीफ भाई इत्यादींच्या उपस्थितीत रोडचे भूमिपूजन व रोडचे लोकार्पण तसेच समाज भवनाचे लोकार्पण संपन्न झाले.
कार्यक्रमा दरम्यान आमदार समीर कुणावार यांनी दखल घेऊन उपरोक्त विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केल्याने हिंगणघाट शहरातील गावकऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत व अभिनंदन सुद्धा केले.
सदर कार्यक्रमादरम्यान शहरातील नगरसेवक-नगरसेविका तसेच असंख्य गावकरी बंधू-भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.