
कोरपना – महेंद्र पिकअप चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची
घटना मंगळवार दि.२८ ला ३.४५ वाजता दरम्यान कोरपना – आदिलाबाद मार्गावरील पारडी गावाजवळ घडली.
आनंद योगाजी बाबुळकर (२१) रा.सावरी त किनवट असे मृतकाचे नाव आहे. तो कोरपना कडे दुचाकीने येत असताना सामोरा समोर पिकअपला धडक दिल्याने जागीच तो मृत पावला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक कर्मचारी बन्सीलाल कुडवले , अशोक मडावी , भगवान पडवाळ व कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला . मृतकाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.
