
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कीन्ही जवादे ता राळेगाव जी.यवतमाळ
आज दि.१२जानेवारी२०२२रोजी
ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे राळेगाव तालुक्यातील पहिले आधार कार्ड सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.या आधार सेवा केंद्रात आधार कार्ड संबंधित कामे तसेच ऑनलाइन कागदपत्रांची कामे होत असल्याने परीसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे.या प्रसंगी कर्तव्यदक्ष सरपंच सुधीरभाऊ जवादे, माजी उपसरपंच रामदासजी माणगी, उद्योजक बाबारावजी नक्षणे, आधार सेवा केंद्राचे संचालक राजु भाऊ मुंडाली, विलासराव चांदेकर, पुंडलिकराव लोणबले, मारुतीभाऊ विठाळे,व नागरीक उपस्थित होते.
