झाडगांव येथे रक्तदान शिबिरात १८ युवकांनी केले रक्तदान

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन पुण्यतिथी निमित्त झाडगाव येथील संत तुकडोजी महाराज मंदिरात रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस तुकडोजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन रक्तदानाला सुरुवात करण्यात आली.
त्यावेळेस रक्तदानासाठी युवकांनी तसेच सौ अर्चना भालचंद्र केवटे राळेगाव पोलीस स्टेशनंचे सहाय्यक निरीक्षक अमोल मुडे साहेब यांनी
रक्तदान करुन युवकांनी रक्तदान करावे असे आव्हान करण्यात आले त्यावेळेस
विरेंद्र केवटे दिनेश भोयर, प्रमोद भगत, अजय ढाले,कुणाल पाल, सारंग मेश्राम, हितेश भोयर, मंथन ब्राम्हणवाडे, स्वप्नील बेलोरकर, प्रकाश कुबडे, संदीप ब्राम्हणवाडे,भालचंद्र केवटे,गौरव पाल, अविनाश राऊत, योगेश ब्राम्हणवाडे,या सह अठरा रक्तदात्यांना रक्तदान करण्यात आले
या रक्तदान शिबीर ाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार अमोल मुडे सहाय्यक निरीक्षक पोलीस स्टेशनं राळेगाव, सरपंच बाबारावजी किन्नाके सामाजिक कार्यकर्ते विनय मुनोत पोलीस पाटील प्रशांत वाणी उल्हास देशपांडे, डॉ. ज्ञानेश्वर मुडे, दिक्षा नगराळे रुपम केवटे उपस्थित होते तर हे रक्तदान शिबिर रुपेश रेंघे, तालुका सेवाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ यांनी आयोजित केले होते.