सेवाभावी दातृत्व असणाऱ्या डॉ. रिया बल्लिकर यांचा नागपुरात नाते आपुलकीचे संस्थेच्या व हेल्पिंग हैंड संस्थेच्या वतीने सत्कार

नागपूर:- आजच्या युगात आरोग्य क्षेत्रात अहोरात्र, परिश्रम पूर्वक बऱ्याच रुग्णांना दुर्धर आजारापासून वाचवण्याचे, रुग्णांना धीर देऊन त्यांना समजून घेण्याचे, किंबहुना गरीब गरजू रुग्णांना औषधोपचाराचा खर्च लाखोच्या घरात असताना आर्थिक तथा औषध रुपी मदत करण्याचे कार्य आजच्या स्वार्थी जगात ओघानेच दिसून येते.. आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध रोगांची लागण होते आहे या आजारांचा इलाज अत्यंत महागडा आहे तो करून घेणे सर्व सामान्यांना परवडण्याजोगे नाही, परंतु अत्यंत गरजू रुग्णांना मदत करण्याचे कार्य काही सेवाभाव जपणारे डॉक्टर पुढे येऊन देवदूता प्रमाणे मदत करते आहे, अशा सेवाभावी कार्याचा सत्कार होणे अभिप्रेत आहे अशाच आरोग्य क्षेत्रात नावाजलेल्या महिला डॉक्टर रियाताई बाल्लिकर medalist, MD medicine , DM (hematology) DNB hematology gold medalist , bone marro transplant physician मोजक्याच रक्त तज्ज्ञ पैकी एक आहे त्यांचे सेवाभावी कार्य सामान्य गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. नागपूर, चंद्रपूर, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, अश्या दूरवरून येणाऱ्या रुग्णांना उपचाादरम्यान आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी व योग्य उपचार पद्धती वापरून त्यांना आर्थिक व मानसिक मदतीचा हात देणाऱ्या डॉ रीयाताई बाल्लिकर यांचा नागपुरात नाते आपुलकीचे संस्थेच्या व हेल्पिंग हैंड संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सन्मानिय सदस्य श्री पुंडलिक बोंडे , योगेश मोवाडे, विकास हजारे, सागर जाधव, रोशन शर्मा, किसन नागरकर यांची उपस्थिती होती..