
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्यातील पहेला येथून जवळच असलेल्या निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप दीपक गंधे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ चे अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या आदेशानुसार जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स चे संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार यांनी कुलदीप दीपक गंधे यांची नियुक्ती एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे . कुलदीप गंधे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी कोरोना काळात गरजू अपंग, विधवा ,गरीब व्यक्तींना अन्नधान्य किटचे वाटप केले .त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बऱ्याच प्रमाणात वह्या पुस्तकाचे वाटप करीत असतात. गावात स्वच्छता मोहीम सुद्धा राबवितात. अडीअडचणीच्या वेळी सुद्धा ते धावून जातात . त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
