
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
‘जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा महिला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या कुमारी रोहीनी श्रावण रणदिवे यांची जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या आदेशावरून जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सचे संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार यांनी एका लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे .रोहिणी श्रावण रणदिवे या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून… त्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे .अनेकांना अडचणीच्या वेळी मदत कार्यात धावून जातात .त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
