भाजपा कार्यकर्त्या कडून OBC प्रवर्गाचे फलक , दुप्पटे व झेन्डे नाल्यात फेकले गेल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा येथिल घटना

प्रतिनिधी:भंडारा

भंडारा येथे माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांच्या नेतृत्वात दि 25 जानेवारी 2021 रोज सोमवारलां भारतीय जनता पक्षा कडून विविध मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले होते.यात युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ) या सामजिक संघटने कडून बस स्थानक परिसर भंडारा या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना व्हावी अश्या स्वरूपाची फलक घेवून रस्त्याच्या कडेला उपस्थित असता भाजपा मोर्चा बसस्थानक परीसरात आले असता त्या ठिकाणी शांतीपुर्वक पध्दती ने युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ) या सामाजिक संघटना च्या वतीने ओबिसी जनगनना करण्यात यावे यासंबंधी विविध आशयांचे फलक घेवून माजी मुख्यमंत्री चे लक्ष वेधून घेण्यासाठी उभे असताना भाजपा चे भंडारा तालुका अध्यक्ष हे जनजागृती करणाऱ्या युवकांच्या अंगावर येवून जोरजबरीने हातातील फलक व झेन्डे , दुप्पटे, बॅनर हे लगतच्या नाल्यात फेकले.
आणि पोलिसांच्या मदतीने युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ) या सामजिक संघटनेच्या सदस्यांना नजरकैद केले. काही वेळेनंतर त्यांना सोडण्यात आले.विरोध करणारे ओबिसी प्रवर्गातिलच असल्याने सामान्य ओबिसी बांधवानी या नेत्याचा जाहिर निषेध करुन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या जनता दरबारात तक्रार करण्यात आली.पालकमंत्री यांनी दखल घेवून संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचा आदेश दिला. जिल्ह्यात सदर घटनेचे तिव्र प्रतिसाद उमटले असून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता अनेक ओबिसी संघटना एकत्रित आले आहेत.युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ)चे जिल्हाअध्यक्ष प्रमोद केसलकर,हितेश राखडे,अविनाश खोब्रागडे,शुशांत नागदेवे,प्रतिक गजभिए,कुणाल पुडके,विशाल राखडे,योगेश बोरकर ,योगेश शेन्डे,शुभम मडावी,स्वप्नील मेश्राम सह इतर कार्यकर्ता नी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.