
स्त्रियांमध्ये जोपर्यंत बदल घडणार नाही, तोपर्यंत समाज घडू शकत नाही–किरण देरकर.
ऍड करिश्मा किंन्हेकर व ऍड पाटील यांनी दिले महिलांना वानातून कायद्याचे ज्ञान.
वणी : राष्ट्रामाता राजमाता जिजाऊ व क्रन्तिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य अभिवादन व स्नेहमीलन सोहळा आयोजित छोरिया ले गणेशपूर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ सभागृहात करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरणताई देरकर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून विजयताई ठाकरे तर मार्गदर्शक म्हणून ऍड करिष्मा किन्हेकार ऍड स्नेहल पाटील तर प्रमुख पाहुणे गीता उपरे, विना पावडे मुख्यद्यापिका, व
आशा खामणकर उपस्थित होत्या. महापुरुषांच्या प्रतिमीच पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी किरण देरकर। स्त्रियांना जोपर्यंत महिला स्वतः मध्ये आत्मविश्वास निर्माण करून स्वतः मध्ये बदल घडवू शकत नाही तोपर्यंत समाज बदलत नाही. असे प्रतिपादन केले.तसेच स्त्री संघटन व आपली एकात्मका व महिलांचे सामाजिक बांधिलकी काय असली पाहिजेत यावर सर्वानी आपले विचार व्यक्त केले. त्या साठी आपल्या जिजामातेचा ते सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजेत असे विचार व्यक्त केले.ऍड करिश्मा किन्हेकर व ऍड पाटील यांनी महिलांना त्यांच्या साठी असलेल्या कायद्याची माहिती दिली.
ह्या कार्यक्रमात गणेशपूर येथील आशा वर्कर यांचा शाल श्रीफल देऊन सन्मान करण्यात आला
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन आयोजन समिती च्या वृषालीताई खानझोडे, मीनाक्षी मोहिते, सविता राजूरकर, श्रुती रासेकर, स्नेहा लालसरे, मंगला देठे, पूजा पानघाटें, रीना मालेकर, प्रणाली चिडे, गौरी तिरानकार, शारदा ढेंगळे, उज्वला लोखंडे, शोभा मोहिते, सविता मेश्राम, नंदा वाढरे, सरिता लिहीतकर, अनिता मेश्राम यांनी परिश्रम घेतले ह्यावेळी परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या.
