
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत पतीने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना शनिवार, 29 जानेवारीला घडली असून दुर्गा मनीष धोटे (वय 22, शारदानगर, वडगाव) असे मृत महिलेने नाव आहे. या प्रकरणी मनीष रमेश धोटे (वय 27) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक‘ार दिली. तक‘ारीनुसार, मनीष धोटे याची पत्नी दुर्गा ही गरोदर असल्याने तिच्यावर डॉ. अभय बेलसरे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी अचानक दुर्गाची प्रकृती खराब झाल्याने तिला पती मनीष याने नेहमीप्रमाणे डॉ. बेलसरे यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
यावेळी डॉक्टरांनी दुर्गा हिला एक इंजेक्शन दिले. त्यानंतर दुर्गा हिचा इलाज माझ्याकडून होत नाही, असे म्हणत तिला सावंगी मेघे किंवा इतर ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे घाबरलेल्या पती मनीष याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच दुर्गा धोटे हिचा मृत्यू झाला. डॉ. बेलसरे यांनी केलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळेच पत्नी दुर्गाचा मृत्यू झाल्याचा आरोप पती पती मनीष धोटे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून रितसर तक‘ार दाखल केली. या प्रकरणाची पुढील चौकशी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील निराळे करीत आहे.
आईसह बाळाचा मृत्यू, सर्वत्र हळहळ : दुर्गा धोटे या 22 वर्षीय विवाहितेचा बाळासह मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शेकडो नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालय गाठून पाहणी केली. वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
प्रकृती चिंताजनक असल्याने रेफरचा सल्ला
दुर्गा धोटे ही महिला गरोदर असल्यामुळे तिची ट्रिटमेंट आमच्याकडे सुरू होती. 17 जानेवारीला ती माझ्याकडे तपासणीकरिता आली होती. त्यानंतर थेट शनिवार, 29 जानेवारीला आली. तिला सर्दी, ताप असल्याचे सांगण्यात आले होते. तिची तपासणी केली असता, प्रकृती चिंताजनक वाटली. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला. 17 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत दुर्गा धोटे या आमच्याकडे भरती नव्हत्याच असे डॉ. अभय बेलसरे यांनी सांगितले.
