
भालर येथे शिवजयंती महोत्सव संपन्न.
भालर येथील छत्रपती शिव महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य व विविध पक्षातील शेकडो लोकांनी संजय देरकर यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. गावातील नागरिकांनी यावेळी संजय देरकर यांचा सन्मान केला.
शिवजयंती महोत्सवाचे उदघाटक म्हणून संजय देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ व प्रमुख पाहणे म्हणून भालर गावातील सरपंच मंदाताई हेपट, संजय देठे अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी. डाँ जंगन जुनघरी, प्रवीणभाऊ खानझोडे, अर्चनाताई हेपट पोलीस पाटील, सुनीताताई देठे ग्रा प सदस्या, प्रमोद दोडके, निलेश उपरे,ग्रा प सदस्य, उपस्थित होते. ह्या वेळी गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
