राळेगांव तालुक्यातील येवती येथे श्री संत गजानन महाराज यांचा १४४वा प्रकट दिन विविध कार्यक्रमाने आयोजन व शिवकृष्ण मंगल कार्यालय चे उद्घाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील येवती येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य विदर्भ स्तरीय वारकरी दिंडी स्पर्धा व शिवकृष्ण मंगल कार्यालय येवती चा लोकार्पण सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके हे होते.तर उद् घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष मा.माणिकरावजी ठाकरे होते.या कार्यक्रमास माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, जिल्हा ओबीसी सेल चे अध्यक्ष अरविंदभाऊ वाढोणकर ,सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव चे मिलिंदभाऊ इंगोले , नगराध्यक्ष नगर पंचायत राळेगाव रविन्द्रजी शेराम, उपाध्यक्ष नगर पंचायत राळेगाव जानरावभाऊ गिरी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे राजेंद्रभाऊ तेलंगे,सरपंच येवती श्रीराम जी सोयाम, सोसायटी अध्यक्ष वसंतरावजी वाघ,गोपालबाबूजी कहूरके,शेर अली,आनंदराव चौधरी, अंकुशभाऊ मुनेश्वर ,किशोरभाऊ धामंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.या.कार्यक्रमात मा.माणिकरावजी ठाकरे,मा.वसंतरावजी पुरके ,मा.राजुभाऊ तिमांडे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजक राजुभाऊ ठाकरे व सौ.मंगलाताई ठाकरे यांचा सत्कार माणीकरावजी ठाकरे , वसंतरावजी पुरके यांनी केला.या दिंडी स्पर्धेचे पुरुष गटात अनुक्रमे ७००१,५००१,४००१,३००१,२००१,१५०१ चे पुरस्कार व महिला गटात ७००१,५००१,४००१,३००१,२००१,१५०१ प्रमाणे विजयी चमुस मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी राजुभाऊ कृष्णराव ठाकरे,गिरीषभाऊ नारायणराव वैद्य,पंकजजी गावंडे,राम कुरटकर ,आशिषजी पारधी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात भाविकगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.