कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

कळंब येथील पोलीस
स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, कर्मचारी ओमप्रकाश धारणे, धर्मराज घायवाटे, अंमलदार विजय लोखंडे, यांना कळंब वरुन १५ मार्चच्या रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान बुलेरो गाडी क्रमांक एम एच आहे. ३२ / एजे ०८६० मध्ये निर्दयपणे जनावरे भरुन यवतमाळ मार्गे भरधाव वेगात जात असल्याचे लक्षात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन चापर्डा गावाजवळ पकडून झडती घेतली. त्यामध्ये ४ जनावरे अंदाजे किंमत ८०,००० रुपये व एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमत १०,००० रुपये व बुलेरो गाडी किंमत ४,१०,००० रुपये असा ५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन आरोपी वाहन चालक स्वप्नील गजानन इखार वय वय ३२ वर्ष व सोबत असलेला ईसम राजु रामदास मगरे वय २२ वर्ष दोन्ही रा. कोरा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा यांना अटक करण्यात आली आहे.वाहन पोलीस स्टेशनला आणून आरोपीची झडती घेऊन अप. नं. १७५ /२२ कलम ११ (१), (क), (घ), (ड) निर्दयपणे वाढगविण्याचा कायदा क, ५, (अ), ५, (ब), ९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क, ११९, मुपोका, क, १८४,/१७७, ८३, १७७/ मो. वा. का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुढील तपास जमा. सुभाष तुकाराम चौधरी करीत आहेत

      .