
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दि 12 ऑगष्ट रोजी वडकी येथील स्व डॉ पुरुषोत्तमरावजी इंगोले सभागृहात स्व मोहित राजेंद्रभाऊ झोटिंग यांचे स्मृतिदिनानिमित्त भव्य मोफत रोगनिदान औषधोपचार व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडकी वाढोना गटाच्या जि. प. सदस्य सौ. प्रितीताई संजयभाऊ काकडे हे होते,तर उद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे हे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून वडकी गावच्या सरपंच सौ मोनिकाताई नागेशजी देठे,वडकी सेंट्रल बँक व्यवस्थापक चंद्रशेखरजी कारेकर,डॉ .चावरे,डॉ विशालजी गावंडे, व अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती.या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली होती,यामध्ये रक्तदान शिबिरात २२ जणांनी आपले रक्तदान करून घेतले, तसेच आरोग्य शिबिरात १९५ नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिराला डॉ पंकजजी टापरे,दिलीपजी बांगरे प्रशांतजी अहितकर,भाष्करजी पाटील, पुंडलिकराव झोटिंग, राजेशजी भोयर,गोपालजी भोयर,यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले,या कार्यक्रमाचे संचालन राऊत सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन चिव्हाणे सर,तर प्रास्ताविक डॉ पंकजजी टापरे यांनी केले.
