वणीत वंचित बहुजन आघाडीचा वर्धापनदिन साजरा स्थानिक स्वराज्य संस्थेत वणीत खाते उघडणारच – जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे


वणी :- नुकत्याच संपन्न झालेल्या नगर पंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने खाते उघडले असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगर पालिकेतही वंचित आपले खाते उघडतील असा विश्वास दाखवून निर्धार व्यक्त करीत यासाठी सर्व तळागळातील कार्यकर्त्यांनी एक संघपणे पक्षाचे कार्य करावे असे मत वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी आज येथील विश्राम गृहात आज ता. २४ मार्च रोजी दुपारी २ वा. वंचितच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष मागील ३ वर्षांपूर्वी स्थापित झाला असून यात सर्व बारा बलुतेदार जाती धर्मातील वंचित घटकांसाठी संघर्ष करणारा पक्ष असून अवघ्या ३ वर्षात हा पक्ष गावागावात पोहचला आहे एवढेच नाही तर सर्व जातीधर्मातील लोक आता या पक्षाकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहे आणि यात सामील होत आहे. त्यामुळे लवकरच वंचितला सुगीचे दिवस येतील असा आत्मविश्वास आहे. असे ही यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना लक्ष्मीकांत लोळगे बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. धम्मावतीताई वासनिक यांनी महिलांच्या संघटनेचे महत्व पटवून दिले. यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉ. काजलताई गायकवाड, शराध्यक्षा सौ. अर्चनाताई नगराळे, शहरमहासचिव डॉ. प्रा. आनंद वेले, पुष्पाताई शिरसाट,तालुकाउपाध्यक्षा सौ. करुणा पाटील, भारतीताई सावते, देवानंद झाडे, गौतम जीवणे, शंकर रामटेके, दादाजी घडले, प्रवीण वनकर, बुधघोष लोणारे, राजू लोहकरे, भारत कुमरे, अजय खोब्रागडे,प्रा आसुटकर, निवृत्ती ताजने, सुषमा दूधगवळी, वैशाली गायकवाड, प्रतिमा मडावी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत केक कापून वंचितचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

किशोरी ताजने हिचा वंचित मध्ये प्रवेश

येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. किशोरी ताजने यांनी आज वंचित च्या वर्धापन दिनानिमित्य तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. धम्मावतीताई वासनिक यांनी त्यांच्या गळ्यात वंचितचा शेला टाकून स्वागत केले.

निराधार शिबाराचे जिल्हाध्यक्षकडून कौतुक

वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी सुरू केलेल्या एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी कौतुक केले असून या शिबिराचे माध्यमातून खर्याअर्थाने लोकसेवा घडीत आहे यामाधातून वंचितचे कार्य लोकांपर्यंत पोहचत असल्याने लोकांच्या मनात एक चांगली भावना तयार होत असल्याचे मत लोळगे यांनी व्यक्त केले